Prakash Ambedkar | चंद्रपूर : वेदांता – फॉक्सकॉन या मोठ्या प्रकल्पानंतर C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला नेण्यात आले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांचे प्रोजेक्ट गुजरातला नेत आहेत. ते फक्त नावाला भारताचे पंतप्रधान आहे. पण प्रत्यक्षात ते गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी व्यवस्था आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जिथे-जिथे जातील तिथे त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. पहिला प्रकल्प गेला, तेव्हा आम्ही जाबाबदार नाही असे, शिंदे म्हणाले होते. पण आता दोन प्रकल्प गेले आहेत. त्याचं उत्तर तुम्ही द्यावे. आणखी एक प्रकल्प जाण्याच्या मार्गावर आहे.”
मोदींची एकही पत्रकार परिषद नाही –
“नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एक तरी पत्रकार परिषद घेतली आहे का?. हा भारतामधला सर्वात मोठा प्रश्न आहे. बाहेर देखील गेले असतील तर तिथे जॉईंट पत्रकार परिषद होतात. तिथे स्टेटमेंट वाचण्यापलीकडे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तरे दिली असतील तर त्याचा व्हिडीओ काढून देशभर पसरवला पाहीजे, अशी माझी भाजपकडे मागणी आहे. शिकलेल्या माणसांबद्दल मोदींना आता अडचण व्हायला लागली आहे. कारण मोदींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. याची सुरुवात सुप्रीम कोर्टाकडून झाली. नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे लिहणारे, बुद्धिजीवी या लोकांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत आहे,” असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गेला –
गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आलेल्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. टाटा एयरबस प्रकल्पामुळे ६ हजार रोजगार उपलब्ध होणार होते. तर वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे १ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती. तसेच बल्क ड्रग पार्क प्रकल्पांसाठी विचाराधीन असलेलं महत्त्वाचं राज्य होतं. यामधून ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असता. पण १ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशला मान्यता दिली. महाराष्ट्राला यामधून वगळण्यात आले. अशाच प्रकारे औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये होणारा मेडिकल डिव्हाइसेस पार्कला देखील केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. हा प्रकल्प तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलवण्यात आला आहे. या प्रकल्पातून ३ हजार रोजगार निर्मिती होणार होती.
महत्वाच्या बातम्या :
- Anushka Sharma। विराटच्या हॉटेल रुम व्हिडीओवर अनुष्का संतापली; म्हणाली ‘हेच तुमच्या बेडरूममध्ये..’
- Electric Bike | लवकरच येऊ शकते ‘या’ बाईक चे इलेक्ट्रिक व्हर्जन
- Raj Thackeray | मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?, राज ठाकरे म्हणाले…
- Nana Patole | “खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, त्यामुळे माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही”
- Volvo EX90 Launch | Volvo ची इलेक्ट्रिक SUV EX90 ‘या’ दिवशी होऊ शकते लाँच