नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत. नरेंद्र मोदी म्हणजे काही देश नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यावेळी सरकारने दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला? दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केले? दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या? असे प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला केले.

Loading...

इतकेच नव्हे तर, मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे. आज जर कॉंग्रेसचे सरकार असते आणि त्यांनीही कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो. असे राज ठाकरे यांनी म्हंटले. तसेच येत्या काळात माझे सरकार आले आणि मी चुका केल्या, फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललं गेलंच पाहिजे. जे चुकीचं सुरू आहे त्याबाबत बोललं गेलंच पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, एअर स्ट्राईकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केले त्यावरून देशाची खिल्ली उडवली जात आहे. असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला