लाट ओसरली? जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींच्या यादीतून मोदी गायब

टीम महाराष्ट्र देशा- ‘टाइम’ मासिकानं नुकतीच २०१८ मधल्या जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी जाहीर केली.मात्र यावर्षी पंतप्रधान मोदींचे नाव गायब असल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फक्त मोदीच नव्हे तर या यादीत भारतातील एकाही राजकारणी व्यक्तीचा समावेश नाही.

भारतात प्रभावशाली नेता म्हणून गणल्या जाणाऱ्या मोदींचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र कमी झाल्याचं दिसून येत आहे. २०१७ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगभरातील प्रभवाशाली व्यक्तींच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश होता. मोदींसोबत २०१७ च्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांचा समावेश होता. यावर्षीच्या यादीतही या नेत्यांचा समावेश आहे पण, मोदींचं नाव मात्र या यादीतून वगळ्यात आलं आहे.Loading…
Loading...