नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वात प्रभावशाली पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली होती. तसेच नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड केली होती. तेव्हापासून नरेंद्र मोदींनी आपल्या अनोख्या शैलीने अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे ते आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली पंतप्रधानांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचले आहेत.

एबीपी न्यूज आणि सी वोटरने केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात प्रभावशाली पंतप्रधान असल्याचं समोर आले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसांच्या कालावधीसाठी हा सर्वे केला होता. या काळात तीन तलाक आणि कलम ३७० असे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या मोदींच्या कार्याला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६६. ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ७.७ टक्के तर इंदिरा गांधी यांना १०.१ तर अटल बिहारी वाजपेयी यांना ९.७ टक्के मते मिळाली आहेत. तसेच ६.२ टक्के लोकांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडला आहे.