मी त्यांचा हनुमान… छाती फाडली तर हृदयात फक्त ‘मोदी’चं दिसतील

पटना:बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय.बिहारच्या रणसंग्रामात अनेक मुलुख मैदान तोफा सध्या कडाडत आहेत.नुकतेच लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा चिराग पसवत यांनी एक वक्तव्य केलं आहे.त्यात ते अस म्हणाले की ‘ नरेंद्र मोदी हे माझे राम असून मी त्यांचा हनुमान आहें. माझी छाती फाडली तर हृदयात मोदीच दिसतील अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली.

नेमकं काय म्हणाले चिराग पासवान ‘मैं तो प्रधानमंत्री का हनुमान हूं. वे मेरे दिल में बसते हैं. मैं दिल चीर कर दिखा सकता हूं मुझे उनकी तस्वीर लगाने की ज़रूरत नहीं है.’

पण त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने मात्र टीका केली आहे.भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की ‘ चिराग पासवान यांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे.त्यांनी उगाच बड्या भाजप नेत्यांचे नावं घेऊन लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू नये.

तसेच चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष हा आमचा ‘ए,बी,सी,डी असा कुठलीच टीमचा भाग नाहीत.माध्यमांनी उगाच चुकीच्या बातम्या प्रसारित करू नये..सध्या बिहार निवडणुकीत ‘मोदी तुझसे बैर नही, लेकीन नितीश तेरी खैर नंही ही घोषणा खुपच गाजते आहे.

महत्वाच्या बातम्या-