भाजपवाले ढोंगी; नरेंद्र मोदी हे पक्के खोटारडे- सिध्दरामय्या

Siddaramaiah-Modi

चित्रदुर्ग: भाजपवाले ढोंगी आहेत. ख्रिश्चन, मुस्लिमांना बाजुला करून ‘सब का साथ, सब का विकास’ असा प्रचार करीत आहेत. नरेंद्र मोदी हे पक्के खोटारडे आहेत. अशी टीका कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले, उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तेथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरू लागला आहे. एका अर्थाने भाजपचे काऊंटडाऊन सुरू झाले. आपल्या मतदारसंघात विजय मिळविता येणे शक्य न झालेले मुख्यमंत्री योगी आदित्याथ हे कर्नाटकात येऊन भाजपला मते मिळणारच, भाजप विजयी होणारच असे सांगत आहेत.

उत्तर प्रदेशात भाजप दुर्बल बनला आहे. मात्र पंतप्रधान मोदी कर्नाटकात येऊन हिंदुत्वावर भाषा करीत आहेत. तेथे हिंदुत्वाची भाषा चालली नाही तर कर्नाटकात कशी चालणार. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून केंद्रात सरकार स्थापन करेल. राबणाऱ्या बैलांना चारा देणे, मजुरी करणाऱ्यांना मोबदला देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. तेव्हा जनता आम्हालाच पाठिंबा देणार आहे, असे सिध्दरामय्या म्हणाले.Loading…
Loading...