fbpx

परदेशात जा. पण त्याचबरोबर भारतातील सर्व ठिकाणी फिरून या – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ धामस्थित एका गुहेमध्ये तब्बल १७ तास ध्यानधारणा केल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा केदारनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भारतातही सगळ्या पर्यटनस्थळी जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, परदेशात जा. पण त्याचबरोबर भारतातील सर्व ठिकाणी जाऊन तिथे काय आहे, हे सुद्धा देशातील नागरिकांनी पाहिले पाहिजे.

केदारनाथमध्ये २०१३ घडलेल्या घटनेनंतर या स्थानाचा पुनर्विकास करण्याचे नियोजन मी केले होते. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मी इथे आलो आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. केदारनाथच्या पुनर्विकास आराखड्यामध्ये प्रकृती, पर्यावरण आणि प्रयत्न या तीन गोष्टींचा मिलाफ आहे, असे त्यांनी सांगितले. आध्यात्मिक चेतनेचे स्थान असलेल्या या पवित्र भूमीवर येण्याची मला खूपवेळा संधी मिळाली, याबद्दलही त्यांनी आभार मानले.