मोदी सरकार भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: अण्णा हजारे पुन्हा एकदा लोकपाल कायद्यासाठी रान पेटवण्याच्या तयारीत आहेत. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार लक्ष केलं आहे. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली.
अण्णा म्हणाले, “  भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदी सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. उलट लोकपाल कायद्याला कमकुवत करण्याचं काम केलं. हे मोदी सरकार भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे.