मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारली – अरुण जेटली

arun jaitley

नवी दिल्ली : आज केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा देत मोदी सरकार आणि भाजपा हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करतंय. तर, विरोधक हा दिवस ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहेत.दरम्यान सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली असल्याचं अरुण जेटली यांनी म्हंटलं आहे.

या फेसबूक ब्लॉगमध्ये जेटली यांनी म्हंटले आहे की, वस्तू आणि सेवा कर लागू करणे, नोटाबंदी, काळा पैश्याविरोधात उचललेली पावले अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. इन्सॉलवन्सी आणि बॅन्क्रप्सी कायद्यामुळेही कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्या नात्यात बदल झाला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं आव्हान स्वीकारवं अशी टीका केली होती, त्यावर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं आहे की, कराचा पैसा सरकारच्या खिशात जात नसतो हे काँग्रेस अध्यक्षांना माहिती असायला हवं.