fbpx

राजतिलक की करो तयारी…एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान व एनडीएच्या अन्य नेत्यांनी अनुमोदन दिलं.

मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यानंतर, नरेंद्र मोदी लगेच आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जातील. यानंतर रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी बोलवतील.