Share

Nashik Accident | नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदतीचा हात; एकनाथ शिंदेकडून ‘इतक्या’ लाखांची मदत तर अमित शहा म्हणाले…

नाशिक : नाशिक (Nashik accident) येथे झालेल्या बस आणि टँकरच्या अपघाताने सर्वांचं मन सुन्न केलं आहे. या अपघातानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मदतीचा हाथ सरसवला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी देखील या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आर्थिक मदत –

नाशिक अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. नाशिक येथील बस दुर्घटनेने मन सुन्न केलं आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. तसेच नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे, जखमींना रु. 50,000, अशी घोषणा करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांचं पाहा ट्विट –

एकनाथ शिंदे यांची घोषणा –

नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे. तर मुख्यमंत्री कार्यलयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथे झालेल्या या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एवढंच नाही तर या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विट –

अमित शहा यांची प्रतिक्रिया –

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो, असं शहा म्हणाले.

पाहा ट्विट –

महत्वाच्या बातम्या :

नाशिक : नाशिक (Nashik accident) येथे झालेल्या बस आणि टँकरच्या अपघाताने सर्वांचं मन सुन्न केलं आहे. या अपघातानंतर अनेक नेत्यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now