एक रुपया झिजवणारा पंजा कुणाचा?- मोदी

पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर बोचरी टिका

वेब टीम : एका माजी पंतप्रधानाने सांगितलं होतं की गावांच्या विकासासाठी दिल्लीतून एक रूपया दिला तर गावात येईपर्यंत त्याचे १५ पैसे होतात. एवढा भ्रष्टाचार असल्याचं त्या पंतप्रधानाचं म्हणणं होतं. पण मला हे सांगा एक रूपये झिजवणारा पंजा कुणाचा आहे? अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी एका सभेस संबोधित करताना त्यांनी कॉंग्रेसचे वाभाडे काढले आहे.

bagdure

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

कॅशलेस व्यवहारावर विरोधकांनी खूप टीका केली. नोटाबंदीविरोधातही खूप बोललं गेलं. पण लक्षात ठेवा. प्रत्येक युगात चलन बदलत असतं. पूर्वी दगड आणि सोने-चांदीही चलन म्हणून व्यवहारात वापरले गेले. नंतर कागदाचा जमाना आला. आता डिजिटल चलनाचं युग आलं असून कॅशलेस व्यवहारांमध्येच भारताचं भविष्य आहे. एका माजी पंतप्रधानाने सांगितलं होतं की गावांच्या विकासासाठी दिल्लीतून एक रूपया दिला तर गावात येईपर्यंत त्याचे १५ पैसे होतात. एवढा भ्रष्टाचार असल्याचं त्या पंतप्रधानाचं म्हणणं होतं. पण मला हे सांगा एक रूपये झिजवणारा पंजा कुणाचा आहे?

You might also like
Comments
Loading...