fbpx

गरीबांची कमाई खाणारे आता चौकीदाराला वैतागले आहेत : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुका आत जवळ येवू लागल्या आहेत. त्यामुळे आता सत्तधारी आणि विरोधक यांच्या मध्ये आरोप – प्रत्यारोप , टीका – टोले ऐकायला मिळत आहेत. आज बिहार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील तुमचा हा चौकीदार संपुर्णपणे जागा आहे, तैनात आहे. सुरक्षा देशातील गरीबाची असो किंवा देशाची, देशाकडे वाईट नजर करणाऱ्या समोर तुमचा हा चौकीदार आणि एनडीए युती छाती ठोकून उभी आहे.’ असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना लावला. आज पटना येथे एनडीएच्या संकल्प रॅली काढण्यात आली होती त्यावेळी मोदींनी समुदायाला संबोधित केले.

यावेळी मोदी म्हणाले की , ‘गरीबांची कमाई खाऊन जे स्वतःची कमाई करत होते, ते आता चौकीदारमुळे वैतागले आहेत. त्यामुळे चौकीदाराला शिव्या देण्याची स्पर्धा सुरु आहे. सरकारने या ५ वर्षात जवळपास ५० करोड गरीबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधेशी जोडले आहे. जवळपास ३५ करोड लोकांचे बँक खाते उघडून दिलेत. जवळपास ७ करोड गरीब महिलांना गॅस कनेक्शन दिले गेले. ३० करोड मध्यमवर्गीयांना इनकम टॅक्स पासून मुक्ती मिळाली. दिड करोड पेक्षा जास्त लोकांना अटल पेंन्शन योजनेशी जोडले.’

यावेळी मोदींनी विरोधकांबरोबरच शत्रू राष्ट्रावर देखील निशाणा साधला. मोदी म्हणाले की, केंद्रातील एनडीए सरकारने देशाला नवीन निती आणि रीति दिली आहे. आता भारत आपल्या वीर जवांनांच्या बलिदानावर शांत बसणार नाही.’