‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ न म्हणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे : नरेंद्र मोदी

narendr modi

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार मधील दरभंगा येथे प्रचार सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस आणि महागठबंधनला लक्ष करत चांगलीच टोलेबाजी केली. काही लोकांना ”भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ असं म्हणायला हरकत आहे. मग अशा लोकांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का?’ असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला.

यावेळी मोदी म्हणाले की, आज महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. मात्र याच दहशतवादाने श्रीलंकेत ३५० लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? असा सवाल त्यांनी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना विचारला. तसेच आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरू आहे. असे देखील मोदी म्हणाले.

Loading...

‘महामिलावट’ करणाऱ्यांसाठी दहशतवाद हा प्रमुख मुद्दा नसेल, पण भारतात दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. गरिबांचे सर्वाधिक नुकसान दहशतवादामुळेच झाले, असे यावेळी मोदी म्हणाले. तुमचे एक मत मोदींना दिले तर मोदी दहशतवाद संपवल्यावरच शांत बसणार असा विश्वास मोदींनी यावेळी जनतेला दिला. तसेच आपला देश हा मजबूत असायला पाहिजे आणि त्यासाठी देशात एक मजबूत सरकार हवं, यासाठी आपलं मत भाजपला द्या असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?