शरदराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी आहे काय? : नरेंद्र मोदी

अहमदनगर : आज अहमदनगर येथे लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपलाच पुन्हा संधी द्या, आमचे सरकार तुमच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे अस विधान केलं. पुढे बोलताना मोदींनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला.

अरे शरदराव ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्या लोगों के आखो मे धूल फेकने के लिए है क्या ? असे बोलून टीकास्त्र सोडले . या विजयी सभेत मोदींनी शेतकरी वर्गास संबोधित केले व पून्हा एकदा मोदी सरकार येणार असा विश्वास दाखवला. तसेच शेतकऱ्यांना पून्हा नव्या सुविधा मिळाणार आहेत . यात शेतकऱ्यांना पेन्शन सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.

अहमदनगर साठी पाणीपुरवठा सुविधा करणार आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार बनेल तेव्हा एक पाणी साठी वेगळी समिती असेल. पाण्यासाठी फक्त भाजपच अग्रणी असेल असा विश्वास देतो असेही मोदी म्हणाले. तसेच शेवटी कॉंग्रेस हटावच्या घोषणाही दिल्या .