‘देशासाठी झटलेल्या इतरांचे महत्त्व गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून कमी केले’

टीम महाराष्ट्र देशा- भारतात गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून इतरांनी दिलेले योगदान आणि इतरांचे बलिदान यांचे महत्त्व कमी केले गेले असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. तिथे राजगढमध्ये मोहनपुरा धरण योजनेचा लोकार्पण सोहळा झाला, या सोहळ्याच्या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आरोप केला.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
देशासाठी ज्यांनी योगदान दिले अशा शामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे, काश्मीरमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा अनेक सुपुत्रांचे योगदान आणि महत्त्व कमी केले गेले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मोदींना समज द्या; मनमोहन सिंग यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र

काँग्रेसचा शहजादा असलेले राहुल गांधी हे मोबाइल पाहिल्याशिवाय दोन वाक्ये लिहू शकत नाहीत