‘ही’ आहे माझी जात ; जात सांगत मोदींचा कॉंग्रेसवर घणाघात 

narendra modi in gujrat
टीम महाराष्ट्र देशा : स्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. काँग्रेस नेते सी पी जोशी यांनी मोदींच्या जात आणि धर्माबाबत प्रश्न विचारले असतानाच आता नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. ते विचारतात मोदींची जात कोणती?. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान परदेशात जातो त्यावेळी देशातील सव्वाशे कोटी भारतीय हीच त्याची जात असते, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजस्थानमधील भिलवाडा येथे प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली. ‘आज संविधान दिवस आहे. संविधानाचे तयार करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातून भेदभाव नष्ट करण्यासाठी मार्ग दाखवला. तर काँग्रेस आणि त्यांचे नेते मोदींची जात कोणती?, असा प्रश्न विचारत आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. जेव्हा देशातील पंतप्रधान विदेशात जातो, त्यावेळी त्याची जात एकच असते आणि ती म्हणजे ‘सव्वाशे कोटी भारतीय’, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला.

एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत- नरेंद्र मोदी

जनता मोदींच्याच नेतृत्वातील एनडीए सरकारला संधी देणार,आठवलेंनी काढला पवारांना चिमटा