काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे? : मोदी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा आहे असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदींनी घणाघाती टीका केली आहे. ‘काँग्रेस हा मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम स्त्रियांचाही आहे? असा सवाल आझमगड येथील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी गांधीना विचारला आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा आहे असे वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी असे वाक्य उच्चारल्याचे वृत्त इन्किलाब या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे असे काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आणि राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले मोदी ?
‘काँग्रेस हा मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम स्त्रियांचाही आहे? अनेक इस्लामिक देशांनी तिहेरी तलाक आणि निकाह हलाला या प्रथा बंद केल्या असल्या तरी काँग्रेससह अनेक पक्षांनी ते कायम ठेवले आहेत. जे राजकीय नेते मला पंतप्रधानपदावरुन बाजूला करण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांनी हलाला आणि तिहेरी तलाकमुळे नुकसान झालेल्या महिलांना भेटून संसदेत या विधेयकावर चर्चा करायला हवे. या पक्षांनी कितीही अडथळे आणले तरी हे विधेयक संसदेत संमत होईल असे आश्वासन मी मुस्लीम महिलांना देतो” असे त्यांनी यावेळेस सांगितले.काँग्रेस पक्ष हा मुस्लीम पुरुषांचाच आहे की त्यात मुस्लीम महिलांचाही समावेश होतो हे मला नामदार (राहुल गांधी) यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'