Narendra Modi | मुंबई : काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांना 1072 मत मिळाली आहेत. तर मल्लिकार्जुन खर्गे यांना 7898 मत मिळाली आहेत.
श्री मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा, त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी जावो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
पाहा ट्विट –
My best wishes to Shri Mallikarjun Kharge Ji for his new responsibility as President of @INCIndia. May he have a fruitful tenure ahead. @kharge
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2022
दरम्यान, या निवडणुकीत 96 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले होते. देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.
राहुल गांधी यांनी दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या अर्धा तास आधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून उल्लेख केला आणि श्री खरगे यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले. आंध्र प्रदेशात पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व करणारे राहुल गांधी मतमोजणी सुरू असताना दुपारी 1.30 वाजण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है”; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला
- Sharad Pawar । माझे सासरे शिंदे होते, म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी; पवारांच्या वक्तव्याने शिंदे-फडणवीस खळखळून हसले
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गटाच्या अडचणी वाढल्या!, ‘या’ बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार
- Eknath Shinde । मी, फडणवीस पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते; शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- Andheri by-election । अंधेरी पोटनिवडणुकीत पटेलांच्या माघारीनंतर लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी? ऑडिओ क्लीप व्हायरल