काश्मीरप्रश्नी पाकिस्तानचा कायमच खोटारडेपणा; कारगिल दिनानिमित्त मोदींचे वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच काश्मीरप्रश्नी भाष्य केले आहे.

नवी दिल्लीत कारगिल विजय दिनाच्या २० व्या वर्षपूर्तीनिमित्त समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी पाकिस्तान सुरुवातीपासूनचा काश्मीरप्रश्नी खोटारडेपणाने वागत आला आहे. आपल्या जवानांनी १९९९ मध्ये त्यांची सगळी कटकारस्थानं उधळून लावली. काश्मीरबाबत पाकिस्तानची सर्व धोरणं कपटी होती. त्यांनी नेहमीच कटकारस्थानं रचली. १९४८, १९६५, १९७१ मध्ये त्यांनी कटकारस्थानं रचली होती. परंतू आपण ती उधळून लावली. १९९९ मध्ये आपल्या जवानांनी त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली अस विधान केले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून संसदेतही गदारोळ झाला होता. परंतु सरकारकडून अशी कोणतीही मदत मदत अमेरिकेकडे मागितली नसल्याच स्पष्ट करण्यात आले होते.