मतदारांचे वोटर आयडी दहशतवाद्यांच्या आयईडीपेक्षा शक्तिशाली – मोदी

narendra modi cast vote

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, देशभरातीलं १७७ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला, यावेळी बोलताना मतदारांचे वोटर आयडी दहशतवाद्यांच्या आयईडीपेक्षा शक्तिशाली आहे, त्यामुळे आपण या वोटर आयडीचे महत्त्व समजून घेत सर्वानी मतदान करावे, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

narendra modi cast vote

नरेंद्र मोदी यांनी प्रथम आई हिराबेन यांची भेट घेत आशीर्वाद घेतले, अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले, यावेळी अमित शहा यांनी देखील मतदान केले आहे. मोदी यांनी यावेळी प्रसारमध्यामांशी संवाद साधत सर्वाना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर मिळणारे भाग्य हे आज मतदान केल्यानंतर मिळत आहे, मतदान केल्याने सर्वाना पवित्रता लाभते. भारतीय मतदार समजूतदार असून त्याला खरे खोटे समजते’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.Loading…
Loading...