बारामतीचे पाणी तोडणाऱ्या रणजितसिंहांची मोदींकडून विचारपूस

blank

टीम महाराष्ट्र देशा :  मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे खासदारांची बैठक बोलावली होती. यावेळी मोदी यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती व उपाययोजना करण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देत रणजितसिंह यांची आपुलकीने चौकशी केली.

लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ राज्यासह देशात  गाजला. यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीचा सामना रंगला होता. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्कंठा सर्वांना लागलेली होती. परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारत माढ्यातून दिल्ली गाठली.

blank

गुरूवारी सायंकाळी ७.०० वा. हॉटेल अशोका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्नेह भोजनासाठी रणजितसिंह यांना खास बोलावणे आले होते. यावेळी मोदी यांनी त्यांना आपुलकीने जवळ घेवून दुष्काळ व विविध विकासकामांवर चर्चा केली. तसेच विकासकामे व दुष्काळ हद्दपार करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासनही मोदी यांनी रणजितसिंह यांना दिले.

दरम्यान, मतदारसंघातील विकासकामांसाठी मदत करण्याचे आश्वासन खुद्द मोदी यांनी दिल्याने नीरा -देवघरचे पाणी मिळण्याच्या आशा शेतकर्यांच्या पल्लवित झाल्या आहेत. तसेच या भेटीची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरु आहे.