ममता बॅनर्जी शूर्पणखा; नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून त्याचं नाक कापतील- भाजप आमदार

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने पुन्हा एकदा वादग्रस्त विधानं केले आहे. आमदार सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शूर्पणखा म्हटलं आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंह मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

bagdure

आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले, भाजपा सरकार असलेल्या राज्यामंधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल देखील जम्मू-काश्मिर बनेल. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचं नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचं नाक कापतील. तसेच ज्या प्रमाणे काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावण्यात आलं त्याचप्रमाणे बंगालमधूनही हिंदूंना पळवून लावलं जाईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पश्चिम बंगालमध्ये रामराज्य आणतील आणि बंगालमध्ये बिभिषणाचा राज्याभिषेक होईल.

You might also like
Comments
Loading...