मोरबीत आल्यानंतर इंदिरा गांधींनी तोंडावर रुमाल झाकून घेतला होता : मोदी

मोरबी – मोरबी धरण फुटले तेव्हा इंदिरा गांधी येथे आल्या तेव्हा त्यांनी तोंडावर रुमाल झाकला होता असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.जनतेच्या पैशावर दरोडा गालणारे आज अर्थतज्ज्ञ बनले असून मोदी म्हणाले, भूकंप आला तेव्हा आम्ही मोरबीत यायला उशीर केला नाही. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सोबत राहिलो याचा इतिहास साक्षीदार आहे.आम्ही गुजरातमध्ये असे काम केले आहे की,100 वर्षे मागे वळून पाहता येणार नाही. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होत आहे तर निकाल 18 डिसेंबरला हाती येणार आहे.