नरेंद्र मोदी २१व्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर

उत्तराखंड : नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशी मुक्ताफळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर उधळी आहेत. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रावत यांच्या या वक्तव्यानंतर उत्तराखंड क्रांती दलाने त्यांच्यावर टीका केली.

केंद्राच्या १० टक्के आरक्षणाच्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना याचा फायदा होईल. नरेंद्र मोदी यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे. त्यामुळेच त्यांनी समजातील सर्व गरीब घटकांचा विचार केला आहे. नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यावेळी म्हणाले.

खुल्या प्रवर्गातील गरीबांसाठी १० टक्के आरक्षणाच्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. आरक्षणासाठी १२४ वी घटनादुरूस्ती विधेयक २०१९ हे बहुमताने मंजूर करण्यात आले.

Loading...

मुख्यमंत्री रावत यांच्या या वक्तव्यानंतर उत्तराखंड क्रांती दलाने त्यांच्यावर टीका केली. सवर्णांना आरक्षण देण्याचे त्यांनी स्वागत केले आहे. परंतु पंतप्रधान मोदींची डॉ. आंबेडकरांशी तुलना करणे हे योग्य नाही. बहुजन समाज पक्षानेही याचा विरोध केला आहे.