नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी

टीम महाराष्ट्र देशा- नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 400 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मनसे जनता दल आघाडीचे ऍड शिवाजी सहाणे यांना 231 मते मिळाली. याठिकाणी भाजपने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही शिवसेनेने विजय मिळविला.

दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करत बाजी मारली आहे. विप्लव बाजोरिया हे 256 मतं मिळवत विजयी झाले असून, काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना 221 मतं मिळाली आहेत.

विजयी उमेदवार
परभणी-हिंगोली
विप्लव बजोरिया (शिवसेना)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
रामदास अंबटकर (भाजप)

नाशिक
नरेंद्र दराडे (शिवसेना)

अमरावती
प्रवीण पोटे (भाजप)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

You might also like
Comments
Loading...