पश्चिम बंगाल तुमची आणि तुमच्या भाच्याची जहागीर नाहीये : पंतप्रधान मोदींचा ममता बनर्जीवर पलटवार

टीम महाराष्ट्र देशा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. दीदी ऐका, पश्चिम बंगाल तुमची आणि तुमच्या भाच्याची जहागीर नाहीये. अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. पश्चिम बंगाल मधील आयोजित सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ मे ळा होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. दीदी तुम्हाला पंतप्रधान पदाचे स्वप्न बघण्याचे पूर्ण मोकळीक आहे. परंतु आमच्या जवानांविरुद्ध गुंडांचा वापर केल्याने तुमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. असे मोदी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, दीदी ऐका पश्चिम बंगाल ही तुमची आणि तुमच्या भाच्याची जहागीर नाहीये. हा भारत मातेचा एक शरीर आहे. असेही पंतप्रधान मोदींनी म्हंटले.