” तुमको ना भूल पायेंगे” नोटाबंदी वर्षपूर्तीला पुणेरी टोमणा

मोदींच्या नोट बंदी वर्षपूर्तीला पुणेरी पाट्यातून फटकारे

टीम महाराष्ट्र देशा – पुणे आणि पुणेरी पाट्या जगभरात प्रसिद्ध आहेत. मोजक्या शब्दात जास्तीत जास्त अपमान हे पुणेरी पाट्यांचे खास वैशिष्ट आहे. अशीच एक हटके पाटी पुण्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीची घोषणा केलेल्या घटनेला ८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ५०० व १००० च्या नोटाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  आहे. या बरोबरच प्रथम स्मृतिदिन दिन देखील साजरा करण्यात आला आहे.तुमको ना भूल पायेगे या आशया  खाली   एक फ्लेग्ज लावण्यात आला आहे.शोकाकुल मध्ये सध्या चलनात असलेल्या नोटांची नावे देण्यात आली आहे याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदीचा प्रसिद्ध डायलॉग देखील वापरण्यात आला आहे.

punere pati
file photo
You might also like
Comments
Loading...