भाजप कार्यकर्ता व त्या महिलेची नार्को चाचणी करा; विनयभंग प्रकरणी भाजप खासदाराची मागणी

bjp

मुंबई : मुंबई येथील एका भाजप नगरसेविकेच्या कार्यलयात एक धक्कादायक घटना घडली असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. बोरिवली येथील एका भाजपा महिला नगरसेविकेच्या कार्यालयातच एका कार्यकर्त्याने एका महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात बुधवारी विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते. मात्र आता भाजपची ताईगिरी कुठे गेली असा खडा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे.

तर आता  या प्रकरणाला राजकीय स्वरूप आले असून काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. भाजपचे खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपूर्ण माहिती घ्यावी, त्यांना माहित नाही की ही महिला 1 वर्षापूर्वी भाजपमध्ये पद घेण्यासाठी आली होती. आणि जर ही घटना 1 वर्षापूर्वी घडली असेल, तर ती महिला कोठे होती, जेव्हा ही घटना घडली, तर मग ती कार्यालयातून बाहेर का आली नाही आणि गोंधळ का निर्माण केला? असा प्रश्न गोपाळ शेट्टी यांनी विचारला.

तसेच यावेळी बोलताना खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, या दोघांची नार्को चाचणी झाली पाहिजे. जर नार्को चाचणीत भाजप कार्यकर्ता चुकीचा आढळला तर मी नाही तर संपूर्ण पक्ष त्या महिलेच्या पाठीशी उभा राहील, कोणत्याही महिलेसोबत अशी घटना घडू नये, असे गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या