तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवल. . . अभिनंदन – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या ३ वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे ट्विट
देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षे यशस्वीरित्या सरकार चालविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालविले. त्यामुळे शिवसेनेला आता नाकच राहिले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.