सुरत न्यायालयाकडून नारायण साईला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार

टीम महाराष्ट्र देशा : बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आसारामबापू पुत्र नारायण साई याला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सुरात सत्र न्यायालयामध्ये नारायण साईवर असलेले बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आहेत.त्यामुळे न्यायालयाकडून नारायण साईला दोषी ठरवण्यात आले आहे. सुरतच्या जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेने नारायण साईवर बलात्काराचे आरोप केले होते, ते आरोप आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत.

पाच वर्षांनी कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. 2002 मधील आरोपांनुसार, नारायण साईने सुरतमधील जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार केला होता आणि त्यानंतर 2004 पर्यंत सातत्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. यानंतर 6 ऑक्टोबर 2013 रोजी पीडितेने नारायण साई, गंगा, जमुना, हनुमान आणि इतर सात जणांवर सुरतमध्ये गुन्हा दाखल केला होता.

साधिकेने आपल्या जबाबात नारायण साईविरोधात सबळ पुरावे दिले होते. नारायण साईविरोधात कोर्टाने आतापर्यंत 53 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काहींनी या दोन्ही बहिणींवर अत्याचार करताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता नारायण साई यांना सुरत न्यायालय कोणत्या प्रकारची शिक्षा सुनावणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...