कुणी हवसे गवसे नवसे खासदार झाले म्हणून विमानतळ होत नाही; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार

मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण0 राणे म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. आता नारायण राणे यांचे चिरंजीव, भाजपचे नेते निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नारायण राणेंचे केंद्रात वेगळं वजन आहे. त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्या सगळ्याचा जिल्ह्याच्या विकासाला फायदा होतो. आता हौसे, नवसे, गौसे फक्त खासदार झाले म्हणून चिपी विमानतळ आलेलं नाही. नारायण राणेंसारखा माणूस केंद्रीय मंत्री झाला आणि नंतर चिपी विमानतळ आलं हे मला सांगायची गरज नाही’, असे म्हणत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

दरम्यान, कुणी हवसे गवसे नवसे खासदार झाले म्हणून विमानतळ होत नाही, असंही म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊतांना जोरदार टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :