नारायण राणेंची आर्थिक गैरव्यवहार आरोपाची चौकशी अचानक बंद? 

Narayan-Rane.

वेबटीम : नारायण राणे यांनी कॉंग्रेसला राम राम करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. आपल्या नवीन पक्षासह एनडीएमध्ये जाणार आहेत  मात्र सत्ताधारी भाजपशी जवळीक निर्माण झाल्याने त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. आता याच प्रकरणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत राणे यांच्याविरोधात थांबविण्यात आलेली चौकशी पुन्हा सुरू करावी, तसेच चौकशीचा अंतिम अहवाल संबंधित कनिष्ठ न्यायालयात ठराविक कालावधीत सादर करण्याचे आदेश ‘ईडी’ला देण्याची मागणी करण्यात आली आहे. तिरोडकर यांच्या याचिकेनुसार नारायण राणे आणि अविघ्न ग्रुपचे कैलाश अग्रवाल यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. यामध्ये ईडीने राणे कुटुंबीय आणि अग्रवाल यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या ५० कंपन्यांची कागदपत्रे मिळवली. त्यांची चौकश केल्यानंतर दोघांनी ३०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रथमदर्शनी निष्कर्षांप्रती ‘ईडी’चा तपास पोहोचला होता. भाजपशी जवळीक निर्माण झाल्याने त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आली असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे .

Loading...