fbpx

VIDEO : अखेर नारायण राणेंनी घेतली खासदारकीची शपथ !

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज खासदार पदाची शपथ घेतली आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रातून नियुक्त करण्यात आलेल्या 6 राज्यसभा खासदारांना आज शपथ दिली गेली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, नारायण राणे यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर शिवसेनेचे अनिल देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं वंदना चव्हाण यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी दिलीय. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आता खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात एंट्री झाली आहे.

पहा नारायण राणे यांचा शपथविधी