fbpx

खासदारकीसाठी नारायण राणेंनी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाचा दिला राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान’पक्षाची स्थापना केली. सुरवातीला भाजप मध्ये जाण्याची वाट पाहत असणाऱ्या राणेंना शिवसेनेने आडकाठी केल्याने स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण आता मंत्रिपद न मिळाल्याने राज्यसभेवर खासदारकी मध्ये समाधान मानणाऱ्या नारायण राणेंना यासाठी चक्क स्वतःच्या पक्षाचाच राजीनामा द्यावा लागला आहे.

नारायण राणे यांनी सोमवारी स्वतः स्थापन केलेल्या पक्षाचा राजीनामा देत भाजपकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकाने राजीनामा देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी

दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत दिल्लीत जाण्यास तयार नसलेल्या नारायण राणेंच भाजपच्या एका बड्या नेत्याने मन वळवल्याने ते राज्यसभेवर जाण्यास तयार झाले, मात्र, नारायण राणेंना राज्यातच मंत्रिपद हवं होत त्यासाठी ते अडून देखील होते. पण भाजपने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने नारायण राणेंकडे पर्यायच उरला नव्हता.