राणेंना भाजपची ऑफर अमान्य ?

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत घेतलेल्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. नारायण राणेंना भाजपातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशाही चर्चा झाल्या. मात्र ही ऑफर नारायण राणे यांना अमान्य असल्याचे दिसते आहे. कारण नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे यांनी एक ट्विट केला आहे.

काय आहे नितेश राणे यांचं ट्विट

दरम्यान, नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं.
“महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.Loading…
Loading...