fbpx

राज्यातील विरोधीपक्ष नेता कोण याचा निर्णय नारायण राणेच करणार- नितेश

नितेश राणे
 राज्यातील विरोधीपक्ष नेतेपद कोणाकडे ठेवायच याचा निर्णय नारायण राणे रिमोट कंट्रोलने करतील अस वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी पुण्यामध्ये केले आहे. नितेश राणे यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतल यावेळी ते बोलत होते.  कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर  नारायण राणे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागले आहे. दरम्यान नितेश राणे यांनी केलेल विधान अनेकांसाठी सूचक अस मानल जात आहे.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र, भाजपमधील वातावरण पाहता सध्या तरी राणे ‘होल्ड’वर असल्याच दिसत आहे. त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश होणार कि स्वत पक्ष काढणार हा प्रश्न आहे. दरम्यान लवकरच पुढील निर्णय जाहीर जाहीर केला जाईल असही नितेश यांनी सांगितल आहे.