उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये; अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन – नारायण राणे

uddhav thackeray vs narayan rane

सांगली: मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मातोश्रीवर बाळासाहेबांना त्रास दिल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पण मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱ्या राणे यांची आमदारकी शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे हुकली. मात्र, आता नारायण राणे हे पक्ष बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. कोल्हापूर मध्ये आपल्या पक्षाच्या झेंड्याच अनावरण करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आक्रमकतेने प्रवेश केला आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीत काहीही होऊ दे, माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी 2017 मध्येच मंत्री होणारच असा दावा राणे यांनी केला आहे.