राणेंचा ‘स्वाभिमान’ आज होणार भाजपमध्ये विलीन

टीम महाराष्ट्र देशा : होय नाही म्हणत आज अखेर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपात प्रवेश होत आहे. त्याच बरोबर राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपमध्ये विलीन होणार आहे. शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतरही राणेंना आज भाजपात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जागांबाबत काहीप्रमाणात तडजोड करु पण राणे यांना भाजपात घेऊ नये अशी अट शिवसेनेनं घातली होती.

राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू आहे; मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता कायम होता. अखेर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणेंचा प्रवेश निश्चित झाला आहे. तसेच त्यांचे पुत्र नितेश राणे यांची कणकवलीतून उमेदवारीही निश्चित झाली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीनीकरणासह नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती जिल्ह्यात लोकसभेला मोठ्या पराभवाला स्वाभिमान पक्षाला सामोरे जावे लागले असले, तरी जिल्ह्यात राणेंची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण अजूनही त्यांच्याभोवताली फिरत असल्याचे चित्र आहे

महत्वाच्या बातम्या