मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्याने सेना मोठ्या संकटात सापडली आहे. याचा धक्का महाविकास आघाडी सरकारलाही बसला आहे. शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक आमदार असून त्यांनी आसाममधील गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहेत. यानंतर या घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राणे यांनी ट्विट करत युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा सोडला आहे. शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?, असं ते म्हणाले आहेत.
शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, 'गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील', अशा
वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?— Narayan Rane (@MeNarayanRane) June 27, 2022
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना म्हणाले होते कि, बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच बंडखोरांना पुन्हा विधानभवांची पायरी चढून देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<