माझं मंत्रिपद रोखण्याइतकी ताकद शिवसेनेत नाही – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : माझ्या मंत्रीपदामुळे बाहेर पडायचेच असेल, तर शिवसेनेने तसे करूनच दाखवावे, माझ मंत्रिपद रोखण्याइतकी ताकद शिवसेनेत नाही असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला लावला आहे.

‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ ही म्हण नारायण राणेंच्या मंत्रिपदाला तंतोतंत लागू पडत असल्याच दिसत आहे. आधी भाजप प्रवेश आणि मग आता मंत्रिमंडळ समावेश राणेंच्या सरकार मधील ‘एंट्री’ शिवसेना सुरवातीपासून ‘नो एंट्री’ चा बोर्ड दाखवत आली आहे. त्यामुळे संतापलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात नारायण राणे यांना स्थान देण्यास शिवसेनेचा विरोध असल्यानेच विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आज नारायण राणे यांनाच विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता नारायण राणे यांच्या या विधानाचा ठाकरी शैलीत समाचार घेतला जाणार आहे याकडे सगळ्या राज्यच लागल आहे.

You might also like
Comments
Loading...