नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेची ‘ऑफर’ दिल्याची चर्चा

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे प्रयत्न

मुंबई: नारायण राणे यांची मंत्रीपदाची तहान पूर्ण होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंना राज्यसभेसाठी ‘ऑफर’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी स्वताचा पक्ष स्थापन केला. त्यांना सत्तेचे लोभ दाखवत भाजपने यशस्वी खेळी केली. मराठा आरक्षण प्रकरणावर ‘राणे’ यांच्या  मंत्रिमंडळ समावेशाचा महाराष्ट्राला फायदा होईल. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असे प्रयत्न केले जात आहेत.  राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राणे यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची ‘ऑफर’ दिल्याच्या चर्चेला उधान आलं आहे.