fbpx

राज ठाकरे – नारायण राणे एकत्र येणार, समर्थकांमध्ये जोरदार चर्चा

टीम महाराष्ट्र देशा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे, याला कारण ठरतेय ते कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी मनसेकडून करण्यात येणाऱ्या आंदोनाचे. कोकणातील पुरामुळे बंधित नागरिकांना मदत मिळवण्यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात येणार असून नारायण राणे यांनी त्याला पाठिबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मालवण येथे खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी नारायण राणे यांनी मनसेच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात राणे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ?, याची चर्चा सुरु आहे.

‘तो’ पराभव कधीही विसरणार नाही, शिवसेनेन केलेला पराभव राणेंच्या जिव्हारी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दारूण पराभव केला होता. नाईक यांनी केलेला पराभव राणेंच्या जिव्हारी लागला आहे. याची सल राणे यांनी बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर हि मागच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तो मी कधीही विसरणार नाही, अशी भावना नारायण राणे यांनी मालवणमधील कार्यकर्ता बैठकीत बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या