उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत:राणे

Uddhav Thackeray, Narayan Rane

 

नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत, तसेच ‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप भाजपच्या वाटेवर असलेल्या नारायण राणेंनी केला आहे. डोंबवलीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

काय म्हणाले राणे ?
कोणत्याच मुलानं बापाला दिला नसेल एवढा त्रास उद्धवनं बाळासाहेबांना दिला, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.उद्धव ठाकरे यांच्यामुळे मी 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडलो. मी साहेबांना त्रास दिला नाही. त्यांना सांगूनच बाहेर पडलो. आज मी तुम्हाला उघडपणे सांगतो. बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला, तेवढा कोणत्याच मुलानं आपल्या बापाला दिला नसेल. मी याला साक्षीदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत, असं राणे यावेळी म्हणाले.Loading…
Loading...