fbpx

भीमा कोरेगावबाबत नेत्यांनी वक्तव्य न केल्यास तणाव लवकर निवळेल – नारायण राणे

narayan rane new political party

टीम महाराष्ट्र देशा-  भीमा कोरेगावमध्ये जे घडले त्याबद्दल कोणाही नेत्याने भाष्य केले नाही तर वातावरण लवकर निवळेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. पण आघाडी झाली तर सिंधुदुर्गमधले तीन आमदार आणि एक खासदार जागेसाठी मागणी करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मंत्रीपद कधी मिळेल या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.

 माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे काल दुपारी पत्रकार परिषद घेतली. तीन वर्षात जिल्हा विकासापासून १० वर्ष मागे पडला आहे. कोणत्याही घोषणांची पूर्तता नाही. रस्ता दुरुस्ती साठी पैसे नाहीत. डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत. महसूल खात्यात लोकांचे शोषण होत आहे. सातबारा, दाखला पैशाशिवाय मिळत नाही. अधिकारी बेजबाबदार उत्तरे देत आहेत. २०१४ ला विमानतळ पूर्ण होऊनही पालकमंत्री २०१८ पर्यंत विमानतळ सुरू करू शकले नाहीत. सी वर्ल्ड काम सुरू करू शकले नाहीत. गोवा विमानतळ सुरू करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रयत्न असल्याचा आरोप राणे यांनी केला.सी वर्ल्ड सुरू करण्याचे काम जाणीवपूर्वक थांबवले आहे. एमआयडीसी, आयटी पार्क सुरू करण्याचा सरकारचा मानस नाही. विकासाला ४० टक्के कात्री लागली आहे. पालकमंत्री केवळ घोषणा करतात. घोषणेपलीकडे काही करत नाहीत. आरोग्यासाठी मी काम केले. निलेश राणे यांच्या फंडातुन हॉस्पिटलसाठी निधी दिला. जिल्ह्यातील अधिकारी पालकमंत्री यांचे ऐकत नाहीत. स्वतः पालकमंत्री सांगतात, माझे अधिकारी ऐकत नाहीत. पालकमंत्री काही काम करत नाहीत, फक्त काम करण्याचा आव आणतात. अशा शब्दात राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. पालकमंत्री पळपुटे असल्याचा आरोप राणे यांनी केला.

राजापूर येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरीला आपला विरोध असल्याच राणे यांनी जाहीर केल. कोकणातील पर्यावरण बिघडेल असा कोणताही प्रकल्प मी येऊ देणार नाही, असे ते म्हणाले. रेशनवर धान्य मिळत नाही. एकीकडे महागाई वाढत आहे, धान्य नाही, विकास कामांना ४० % कात्री लावली जात आहे. जिल्हा नियोजनची मिटिंग मार्च नंतर लावली नसल्याकडे राणे यांनी लक्ष वेधले.१ ते १५ फेब्रुवारीला स्वाभिमान पक्षाची सभासद नोंदणी सुरू करणार असून संपर्क आठवडा राबविणार असल्याच राणे यनी स्पष्ट केल. याच दरम्यान प्रवेश घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा व खासदारकी जिंकण्याचा आमचा संकल्प आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. पण आघाडी झाली तर सिंधुदुर्गमधले तीन आमदार आणि एक खासदार जागेसाठी मागणी करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

मंत्रीपद कधी मिळेल या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी सरकारने चौकशी लावली आहे. त्यामुळे या प्रकरणी राजकीय नेत्यांनी टीका टिप्पणी टाळावी, असा सल्ला त्यांनी दिला. पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींची वेळ मागितली आहे. येत्या एक माहिन्यात हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. मडूरा येथे रेल्वे टर्मिनस साठी जागा उपलब्ध होती, मात्र मी सांगतो म्हणून विरोध केला. मग तत्कालीन रेल्वेमंत्री आता रेल्वे टर्मिनस सुरू का करू शकले नाहीत ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. आरोग्य सेवेसाठी गोव्यावर अवलंबून का राहता? पडवे येथील हॉस्पिटलच्या माध्यमातून मी लोकांना जिल्ह्यात आरोग्य सेवा देणार असल्याच त्यांनी जाहीर केले. मंत्रिमंडळ प्रवेश लवकरचराज्यातील आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशास दीर्घकाळ लागणार नाही, लवकरच आपला मंत्रिमंडळ प्रवेश होईल. जास्तवेळ थांबायची मला सवय नाही असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.