शिवसेनेच्या भीतीनेच राणेंना राज्यसभेची ऑफर – रामदास आठवले

ramdas aatahavle

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भीती असल्यानेच भाजपने नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न देता राज्यसभेची ऑफर दिल्याच खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

‘नारायण राणे हे मंत्रीपदाचे दावेदार असल्याने राज्यात नाही तर केंद्रात त्यांना मंत्री करावे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोलणार’ अशी मागणीही आठवले यांनी केली.

दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र लढावं असा पुनरुच्चारही आठवलेंनी केला. ते नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.