अखेर नारायण राणेंच्या पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त ठरला

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा;- राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे गेल्या दोन महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधान आले होते. परंतु नारायणे राणे यांचा भाजप प्रवेश काही झाला नाही .मात्र आता नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाची  तारिख घोषित केली. राणेंनी सांगितले की त्यांच्या स्वाभिमान पक्षाचं येत्या १५ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, या विलीनीकरणासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.सावंतवाडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता तरी नारायण राणेंचा खरोखर भाजपप्रवेश होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र, त्यांच्या भाजपप्रवेशात अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या