Share

Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का ?, नारायण राणे म्हणाले…

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट (Thackeray Group) दसरा मेळाव्याची (Dasara Melava) तयारी करत आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर आहे. तर ठाकरे गटाचा दादरमधील शिवाजीपार्कवर आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडल्यासारखे आरोप, टोलेबाजी करत आहेत. तर बाकीचे नेतेही या दसरा मेळाव्यावरून भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दसरा मेळाव्यावरून एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

शिंदे गटाकडून किंवा ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण आल्यास, तुम्ही उपस्थित राहणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आम्हाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा कोणत्याही बाजूने आमंत्रण आले तर नक्कीच उपस्थित राहू. नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं, उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत याची मला खात्री आहे.

उदय सामंत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उडवली खिल्ली 

तसेच, भाजपचे नेते तथा कॅबिनेट मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा मेळावा नाही. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे.

आता राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसकडून (Congress) शिवसेनेला मदत मिळत आहे आणि काल त्यांच्या गटातील नेते हे भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांचा होणारा हा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नसून हा महाविकास आघाडीचा मेळावा असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट (Thackeray Group) दसरा मेळाव्याची (Dasara …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now