मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणारच; नारायण राणेंचा दावा

मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणारच; नारायण राणेंचा दावा

Narayan Rane

मुंबई : राज्यात महायुती तुटून महाविकास आघाडी सरकार आलं. हे सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार सरकार पडण्याची वक्तव्ये केली गेली. राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे सरकार कोसळण्याबाबत पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. महाविकास आघाडी सरकारचं आयुष्य लवकरच संपणार आहे, अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही त्यामुळे भेदभव केला जात आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाही. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

जो व्यक्ती आजारी आहे. आणि बेडवर आहे त्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचं आघाडीचं सरकार आहे त्याचं आयुष्य जास्त नसल्याचाही सूचक इशारा राणेंनी दिला. यावेळी पत्रकारांनी मार्चपर्यंत सरकार बदलणार का?, असं विचारलं असता नारायण राणेंनी हसत त्यावर उत्तर देणं टाळलं आहे.

महत्वाच्या बातम्या: