नारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत

अहमदनगर : आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांचा प्रवास आता नव्या वळणावर येऊन पोहचला आहे. 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची वणवण सुरूच असल्याने राणे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आसल्याचे संकेत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. अहमदनगरच्या नेवासात काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही. त्यांना आजही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवणारं सूचक विधान थोरात यांनी केलं आहे.

शिवसेनेसोबत युती करणे हाच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी रामबाण उपाय असल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने सेनेवर थेट टीका करणे आता भाजपनेते टाळू लागले आहेत. मुख्यमंत्री,महसूलमंत्री,प्रदेशाध्यक्ष यासह अनेक दिग्गज नेते सेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत. सेनेसोबत ३६ चा आकडा असलेले राणे यामुळे अस्वथ आहेत. त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. पण राणे काँग्रेसमध्ये येणार याचाच दुसरा अर्थ शिवसेना आणि भाजपची युती होणार असा घ्यायचा का? असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.

शोध व्यक्तिमत्वाचा :